काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना आयएसआयकडून / काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना आयएसआयकडून फूस

वृत्तसंस्था

Jul 23,2011 03:57:42 AM IST

वॉशिंग्टन. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था एफबीआयने आयएसआय एजंट फाईविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. आयएसआय काश्मीरमधील अतिरेकी संघटनांना मदत करत असल्याचेही एफबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे. अलेक्झांड्रिया जिल्हा न्यायालयात ४३ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना आयएसआयकडून मदत पोहोचवली जात असल्याचे एफबीआयचे विशेष अधिकारी सराह वेब लिंडेन यांनी आरोपपत्रात म्हटले आहे.X
COMMENT