जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांचा ब्रँड घेण्यासाठी ग्राहकांची ओढ असते. जगातील दुस-या क्रमांकाचे बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा 'चीन' जगभरातील विविध नामवंत कंपन्यांचे नकली ब्रँड तयार करून स्वस्तात विक्री करत आहे.
नकली वस्तुला चीनमध्ये 'शानझाइ' हा शब्द वापरला जातो. जगभर प्रसिद्ध असलेल्या अदिदास, नायकी, प्यूमा यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे नकली ब्रॅड चीनमध्ये तयार होत आहे.
असे ब्रँड तयार करण्यात चीनी लोकांना कमीपणा वाटत नसल्याचे सांगितले जाते. प्रसिद्ध ब्रँड सारखे अनेक ब्रँड स्वस्त आणि चांगला मिळत असेल तर तो घेतला तर कुठ बिघडत अशा प्रतिक्रीया चीनी नागरिक देतात. या देशात प्रत्येक ब्रँडची नकल केली जाते. जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांना मात्र चीनमध्ये
आपला बिझनेस वाढवता आलेला नाही. भारतासारख्या देशातही चीनमध्ये तयार होत असलेल्या वस्तुंचा प्रभाव वाढत असल्यामुळे, ब्रँडेड कंपन्याच्या उत्पादनावर याचा परिणाम झाला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा चीनमध्ये कोणत्या प्रसिद्ध ब्रँडचे डुप्लिकेट तयार केले जातात...