आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pakistan Diary: पा‍कमध्ये आणखी एका मंदिरावर पडणार हातोडा, पाहा 8 ऐतिहासिक मंदिरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील मंदिरे सध्‍या संकटात सापडली आहेत. रावळपिंडीमधील मंदिरांवर येऊ घातलेल्या संकटामुळे येथील हिंदु समुदाय अस्वस्‍थ झाला आहे. लष्‍कराला अडथळा ठरलेले एक ऐतिहासिक मंदिर पाडण्‍यात येणार आहे. याबाबत अल्पसंख्‍याक हिंदु समुदायाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने कारवाई थांबवण्‍याचे आदेश दिले.
मात्र पाकिस्तानमधील हे एकच मंदिर नाही. यापूर्वीही अनेक मंदिरे पाडण्‍यात आली आहेत. या कारवाईवर स्थानिक प्रशासनाचे कोणतेही न‍ियंत्रण नाही. रावळपिंडीतील मंदिर हिंदु समुदायाच्या धार्मिक कार्याचे केंद्र आहे. येथे अनेक हिंदु महोत्सव आयोजित केले जातात.

पुढे वाचा... पाकिस्तानमध्‍ये असलेल्या ऐतिहासिक मंदिरांविषयी... आणि त्यांच्या दुर्दशेविषयी...