आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगवान वायरलेस डेटा ट्रान्सफर विकसित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - वायरलेस डेटा ट्रान्सफर ही बाब आता नवी राहिली नसली तरी बदलत्या काळात ही प्रक्रिया अत्यंतिक वेगाने होणे गरजेची आहे. उद्याची ही गरज ओळखून एका युरोपीयन संस्थेने अति वेगवान डेटा ट्रान्सफर करणारी प्रणाली विकसित केली आहे.

"आय ब्रो' नावाने चालवल्या गेलेल्या प्रकल्पाअंतर्गत युरोपातील काही विद्यापीठे व खासगी कंपन्यांनी एकत्रितपणे संशोधन करून ही प्रणाली विकसित केली. यात फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगाल या देशांतील कंपन्यांचा समावेश आहे. अल्ट्रा ब्रॉडबँड वायरलेस कम्युनिकेशनसाठी रिझोनंट टनेलिंग डायोड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यावर एकट्या ग्लासगो विद्यापीठाने ३ लाख पौंड खर्च केले आहेत.सध्याच्या जीबीपीएसपेक्षा किमान दहा पट अधिक वेगाने डेटा ट्रान्सफर करू शकणारी ही प्रणाली आहे.