आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fastest Woman Breaks Record For Quickest Electric Motorbike, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात वेगवान इलेक्ट्रिक मोटारबाइक.... आणि त्या युवतीने बनवला जागतिक विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( आपल्या इलेक्ट्रिक मोटारबाइक किलोजाऊलोसह एव्हा हकन्सन)
एव्हा हकन्सनने सर्वात वेगवान इलेक्ट्रॉनिक मोटारबाइक चालवण्‍याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. हा विक्रम त्याने स्वत: तयार केलेल्या मोटारबाइकने केली आहे. एव्हाने आपली किलोजाऊलो मोटारबाइकसह या आठवड्यात अनेक विक्रम तोडली. तिने 389. 219 किमी प्रति तास हा नवा विक्रम प्रस्थापित केला. एव्हा आता जगातील सर्वात वेगवान मोटारबाइक चालवणारी महिला बनली आहे. तिची इलेक्ट्रीक मोटारसायकल जगातील सर्वात वेगवान बाइक बनली आहे. ही स्पर्धा माझ्यासाठी ऐतिहास‍िक आहे, असे एव्हा सांगते. तिने एनएसएफ सेंटरमध्‍ये मॅकेनिकल इंज‍िनिअरिंगमध्‍ये पीएचडी केली आहे.

किलोजाऊलो खूपच महागडा प्रकल्प आहे. हा प्रकल्प तिने आपल्या पतीबरोबर पूर्ण केला. तिचे पती नॅशनल ओशियनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्‍ट्रेशनमध्‍ये शास्त्रज्ञ आहेत. मोटारबाइकचे डिझाइन परिवार आणि मित्रमंडळींनी एकत्र येऊन पूर्ण केले आहे. एव्हाने आपल्या 80 टक्के गाड्या स्वत: बनवले आहे. किलोजाऊलो मोटारबाइक बनवण्‍यासाठी 5 वर्ष लागली. नुकतीच झालेली बोन्नेविल्ले मोटारसायकल स्पीड ट्रेल स्पर्धेत एव्हाने गतीचा नवा विक्रम स्थापित केला. तिचा जन्म स्वीडनमध्‍ये झाला. लहानपणापासून तिला शर्यतीचे आकर्षण होते. आपल्या पित्यासह तिने स्वीडनमधील पहिली इलेक्ट्रीक मोटारसायकल बनवली होती. जिचे नाव इलेक्ट्रोकेट असे होते.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा एव्हा हकेन्सनची शर्यत आणि मोटारबायक बनवण्‍या दरम्यानची छायाचित्रे...