आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढेरपोटे ब्रिटिश जवान लढण्यास असर्मथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटिश लष्करातील साधारण 22 हजार जवानांना लठ्ठपणाची समस्या असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटिश सैनिकांचा लठ्ठपणा एवढा आहे की ते लढण्याच्या आघाडीवर कुचकामी ठरू शकतील.

गेल्या तीन वर्षांतील चाचणीत लठ्ठ सैनिकांना टाइप 2, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होण्याची जोखीम वाढू शकते. सुरक्षा जवानांच्या आहार पद्धतीमुळे त्यांच्यात मेदवृद्धी झाली. जवानांना कमी उष्मांकाचे पदार्थ दिले जातात.
न्याहरीवेळी तसेच डिनरवेळी चिप्स पुरवले जात असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍याच्या हवाल्याने संडे टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. सायंकाळी 5.00 वाजता जवानांचे जेवण होते. बॉडी मास इंडेक्सच्या पारंपरिक पद्धतीने मोजल्या जाणार्‍या लठ्ठपणावर टीका होत आहे. तंदुरुस्त असला तरी अतिरिक्त वजन असलेल्या व्यक्तीची दखल घेतली जात नाही. असे असले तरी लष्करामध्ये तंदुरुस्तीसाठी विविध योजना आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांना वर्षातून एक वेळेस पर्सनल फिटनेस असिस्टंट (पीएफए) चाचणीतून जावे लागते. गेल्या तीन वर्षांत 32 हजार सैनिक या चाचणीत अपयशी ठरले.