Home | International | China | father attack own girl china

भर रस्त्यात पोटच्या लेकीवर तलवार

agency | Update - Jun 03, 2011, 03:29 AM IST

भरगच्च गर्दीतून सुसाट निघालेल्या झँग गाँग याने एका कारला धडक दिली.पोलिसांना पाहताच त्याने कारचा वेग वाढवला.

  • father attack own girl china

    भरगच्च गर्दीतून सुसाट निघालेल्या झँग गाँग याने एका कारला धडक दिली.पोलिसांना पाहताच त्याने कारचा वेग वाढवला. 15 मिनिटांच्या पाठलागानंतर तो गाठला गेला आणि सुरू झाले थरारनाट्य. चीनच्या युनान प्रांतातील ही घटना.
    झँगसोबत पत्नी, मुलगी होती. पोलिसांनी घेरताच झँग संतापला. मुलीला बखोटीला धरत धारदार तलवार तिच्या छातीवर ठेवून तो ओरडला. मला जाऊ द्या, नसता पोरीचा गळाच कापतो. झँगचा अवतार पाहताच सगळे स्तब्ध झाले.
    आक्रमक झँगला पाहून पोलिस गांगरले. पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंगवून ठेवले. थोड्याच वेळात झँगचे वडील, नातलग आले. झँगची सर्वांनी समजूत काढली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि तासाभराच्या नाट्यावर पडदा पडला.

Trending