आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवडता रविवार झाला नावडता!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - वीकेंडची मजा आता संपल्यात जमा आहे. रविवार हा परंपरेने विश्रातींचा दिवस. मात्र हक्काच्या सुटीच्या दिवशीही प्रत्येकालाच साफसफाई किंवा धुण्यासारखी किमान 15 घरकामे करावी लागत असल्यामुळे रविवार हा विश्रांतीचा दिवस राहिलेलाच नाही, असे ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अध्ययनात म्हटले आहे.
ब्रिटनमधील सर्वेक्षणात प्रत्येक दहापैकी एक व्यक्तीने रविवार हा आठवड्यातील सर्वात व्यग्र दिवस असल्याचे म्हटले आहे. इस्त्री करणे, साफसफाई, कपडे धुणे, आठवड्यातील प्राधान्यक्रमाची यादी तयार करणे अशी अनेक कामे रविवारी करावी लागतात.


दोन तृतीयांश लोक आठवडाभर दुर्लक्षित राहिलेली कामे रविवारी करतात. महत्त्वाची घरकामे करण्यात व्यग्र असतात, असे बेथ मॅकडोनाल्ड आॅफ शेफ अँड ब्रेवेरने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. ईस्टर संडेच्या दिवशीही मित्र किंवा कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यापेक्षा अनेक जण घरकामातच व्यग्र असतात, असे या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.