आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवडत्या घोड्याने मालकिणीला म्हटले 'गुडबाय'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये ग्रेटर मँचेस्टरजवळ बाईकशॉ भाग असून तेथील विगेन रॉयल हॉस्पिटलमध्ये शीला मार्श नावाची वृद्धा (७७) उपचारासाठी दाखल झाली होती. त्यांनी आयुष्याच्या अंतीम समयी त्यांचा आवडता घोडा ब्रॉनवेनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हॉस्पिटल व्यवस्थापनाने तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मार्शचा बेड हॉस्पिटलच्या बाहेर आणला. त्यायोगे त्यांच्या ब्रॉनवेन या आवडत्या घोड्याला भेटू शकतील.
खाटेवर असलेल्या आपल्या मालकिणीला पाहताच ब्रॉनवेन त्यांच्याजवळ आला. त्याने मिसेस मार्शच्या डोक्याजवळ तोंड नेले आणि असा भाव त्याच्या डोळ्यात दिसला की, जणू तो त्यांना गुडबाय म्हणतोय. ब्रॉनवेनची भेट झाल्यानंतर मार्शने जगाचा निरोप घेतला.
telegraph.co.uk