आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FBI Says Letter To President Obama Tests Positive For Ricin

बराक ओबामांच्या टपालात जीवघेणा विषारी पदार्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकी राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मिळालेल्या टपालात विषारी रिसीन पदार्थ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याआधी काहीवेळापूर्वी अमेरिकी सिनेटरच्या पत्रात हा पदार्थ लावल्याचे दिसून आले आहे. विषारी पत्राच्या पार्श्वभूमीवर सिनेटर्सना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. अमेरिकी गुप्तचर संस्था एफबीआय व अन्य सुरक्षा संस्थांनी तपास सुरू केला आहे. व्हाइट हाऊस परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अमेरिकी सिनेटच्या पत्त्यावर येणारे टपाल रोखण्यात आले आहे. राजधानीतील टपाल कार्यालय तात्पुरते बंद करण्यात आले आहे. सिनेट सार्जेंट अ‍ॅट आर्म्स टेरेस गेन्स यांनी सांगितले की, सिनेटर रोजर विकर यांना पाठवलेल्या पत्राला अतिविषारी रिसिन लावल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी याबाबतचा चौकशी अहवाल प्रसिद्ध झाला. या पत्रावर मेम्फिस, टॅनेसीच्या टपाल कार्यालयाचे शिक्के आहेत. मात्र, पाकिटावर पाठवणाºया व्यक्तीचे नाव व पत्ता नाही. गेन्स यांनी एका बैठकीत सिनेटर्स तसेच एफबीआय संचालक रॉबर्ट मूलर आणि अंतर्गत सुरक्षा मंत्री जेनेट नेपोलिटानो यांना राइसिनच्या धोक्याची माहिती दिली. बोस्टन स्फोटाची माहिती देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

काय आहे रिसिन
रिसिन एक प्रकारचे विष आहे. त्याचा साधा वास धोकादायक ठरू शकतो. याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा 36 ते 72 तासांमध्ये मृत्यू होऊ शकतो. अमेरिकेत 2004 मध्ये याचे संकट वाढले होते. बुल्गारियाचे लेखक ज्यार्जी मारकोव यांचा 1978 मध्ये रिसिनमुळे मृत्यू झाला होता. त्या वेळी या विषारी पदार्थावर खूप चर्चा झाली.

अ‍ॅँथ्रेक्सचे लिफाफे
11 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अल-कायदा संघटनेने अ‍ॅँथ्रेक्सचे लिफाफे पाठवले होते.