जगातील पहिल्या ट्रान्सफॉर्मर 'फ्लाइंग कार'च्या चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. आता या कारला बाजारपेठेत आणले जाणार आहे. ही कार केवळ रस्त्यांवर धावत नाही तर अगदी विमानाप्रमाणे हवेत उडते. यात दोन आसन व्यवस्था आहेत.
स्लोवाकिया कंपनीची ही कार दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रियाच्या 'पायोनियर्स फेस्टिव्हलमध्ये लॉंच करण्यात आली होती. 'एरोमोबिल' (AeroMobil) नावाची ही कार प्रति टॅंक पेट्रोलमध्ये 430 मैल (645 किमी) उड्डाण करु शकते. सुमारे 9,800 फुटांवरुन ही कार उड्डाण करु शकते.
कंपनीने अद्याप या कारची किंमत सांगितलेली नाही. रिडिझाईन करुन यातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कारला कुठेही सहजपणे पार्क केले जाऊ शकते. याचे विंग्ज फोल्ड करता येतात. त्यामुळे उड्डाण झाल्यावर तिला कारचे रुप येते. एरोमोबिल थर्ड जनरेशन कारचे लेटेस्ट व्हर्जन आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या कारचे मन मोहून घेणारे फोटो...आणि भन्नाट व्हिडिओ...