आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Female Face Temperature Increases When She Meets A Male

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘तो’ भेटताच ‘ती’ खुलते!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- एखाद्या पुरुषासोबत साध्या बोलण्यानेदेखील महिलांचा चेहरा अगदी खुलतो, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.
पुरुषांना भेटताच महिलांच्या चेह-याचे तापमान आपोआप वाढू लागते, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. सेंट अँड्र्यूज विद्यापीठाच्या वतीने हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधक चमूने महिलांमधील बदलाचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी महिला-पुरुषांची भेट घडवून आणली. त्यांच्यातील बदल टिपण्यासाठी ‘थर्मल इमेजिंग’चा वापर केला. त्यातून त्यांना महिलांमधील बदलाची प्रक्रिया लक्षात आली. पुरुषांच्या सहवासात आलेल्या महिलांच्या चेह-याचे तापमान कमालीचे वाढते, असे त्यात आढळून आले. या परिणामांना थर्मल इमेजिंगच्या विकासासाठी वापरले जाऊ शकते. यातून तणावावर नजर ठेवली जाऊ शकते. भविष्यात याचा दुसरा फायदा म्हणजे लाय डिटेक्टर चाचणीमध्येही याचा वापर केला जाऊ शकतो. या प्रयोगात महिला व पुरुषांना कोणत्याही प्रकारची उत्तेजना देण्यात आली नव्हती. सर्वसाधारण सामाजिक भेटीत हे परिवर्तन पाहायला मिळाल्याचे या अभ्यासाच्या प्रमुख अमांडा हाहन यांनी सांगितले. या भेटीत सहभागी झालेल्या महिला कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा गैरसोय अनुभवत असल्याचे दिसून आले नाही. या महिन्यात ‘बायोलॉजी लेटर्स’मध्ये या संशोधनाचे प्रकाशन होणार असल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. अशा भेटीत प्रतिक्रिया केवळ महिलांमध्येच व्यक्त होत असल्याचे दिसून आले आहे. दोन महिलांमध्ये झालेल्या भेटीत अशा प्रकारची प्रतिक्रिया मात्र दिसून आली नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या शारीरिक बदलांचा परिणाम सामाजिक भेटीगाठींवर होतो का, हे जाणणे या संशोधन करणाºया टीमचे पुढील लक्ष्य आहे.