आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ferry Stricken By Blaze Fully Evacuated, 10 Dead, Saved 470 People

जहाजाला समुद्रात आग, 470 प्रवाशांचे प्राण वाचवले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉरिग्लिआनो- ग्रीसहून इटलीकडे येणाऱ्या आग लागलेल्या जहाजात किमान 13 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. चालकरहित स्थितीमध्ये असलेले हे जहाज अनेक तासांनंतर इटलीच्या बंदरावर दाखल झाले. नौदलाच्या अथक प्रयत्नातून मोठी दुर्घटना टळली आणि जहाजातून प्रवास करणाऱ्या सुमारे 470 जणांचे प्राण वाचू शकले.

हे जहाज ऑटो पायलट मोडवर चालत होते. त्याला आग लागली होती. इटलीच्या किनाऱ्यावरून 40 किलोमीटर परिघात असताना प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी इटलीच्या नौदलाने प्राणांची बाजी लावली. त्यांच्या प्रयत्नामुळेच जहाजावरील इतर प्रवासी सुरक्षित राहू शकले आणि मोठा अनर्थ टळला. जहाजाला किनाऱ्यावर सुखरूप आणण्यासाठी नौदलाने हेलिकॉप्टरची मदत घेतली. जहाजाला टो करून आणण्यात आले. बुधवारी नौदलाला अशा प्रकारे भरकटलेली जहाजे आढळून आली होती. जहाजातून स्थलांतरित लोक बेकायदा वाहतूक करत होते. हे प्रवासी सिरियातील आहेत, असा दावा इटलीच्या मीडियातून करण्यात आला आहे. दरम्यान, जहाजात 60 मुले आणि दोन गरोदर महिलांचाही समावेश असल्याचे आढळून आले.