आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांचा चिमुरडा बनला वैमानिक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमध्ये एका पाच वर्षांच्या मुलाने विमान उडवून सर्वात कमी वयाचा पायलट होण्याचा बहुमान मिळवला आहे. यिडे असे या चिमुरड्या पायलटचे नाव असून घरचे लोक त्याला लाडाने डुओडुओ म्हणतात. 31 ऑगस्ट रोजी त्याने बीजिंगच्या वन्यजीव उद्यानावर तब्बल 35 मिनिटे विमान उडवले. डुओडुओने बीजिंगच्याच एका विमान उड्डाण क्लबमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले असून त्याने 30 किलोमीटर विमान उडवले, असे त्या क्लबचे प्रभारी झांग योंगहुई यांनी म्हटले आहे. डुओडुओचे वडील लिईशेंग यांना आपला मुलगा धाडसी व्हावा आणि नावीन्यपूर्ण शिकण्याची त्याची इच्छा प्रबळ व्हावी, अशी अपेक्षा आहे.