मेलबर्न - क्विन्सलँडमध्ये पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फू) आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव नऊ दिवस चालणार आहे.
26 जून पासून हा महोत्सव सुरू होईल. त्यात वर्ल्ड प्रिमियर, आॅस्ट्रेलियन चित्रपटांचे देखील प्रिमियर होणार आहेत. हा समारंभ ब्रिसबेन येथे होईल. नऊ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. आॅस्ट्रेलिया आणि भारतातील दिग्दर्शक, चित्रपट विषयाचे विद्यार्थी यांचा या निमित्ताने संवाद होऊ शकेल. पुरस्कार विजेते निर्मात्याचा रोमिओ + ज्युलिएट, मॉलिन रॉग, मार्टीन ब्राऊन यांच्यासह बॉलीवूडमधील लेखक फारूख धाँडी, दिग्दर्शक जीन-मार्क सुर्सिन हे महोत्सवात परीक्षक म्हणून हजेरी लावतील. इफ्फूचे आयोजन क्विन्सलँड विद्यापीठात केले जाईल.