आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally 800 Hundred Terrorist Now Face Execution, Pakistan Use Language Of India

८०० दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी, दहशतवादावर पाकच्या तोंडी भारताचीच भाषा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाक लष्कर व सरकार १३२ मुलांच्या आहुतीनंतर खडबडून जागे झाले आहे. लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी बुधवारी काबूलमध्ये अफगाण सरकारला तालिबानी म्होरक्या फजलुल्लाहला ताब्यात द्या, अन्यथा हल्ला करू, असा दम भरला. नवाझ सरकारनेही फाशी न देण्याचा ६ वर्षांपूर्वीचा निर्णय रद्द केला. अशा अतिरेक्यांविरुद्ध दोन दिवसांत डेथ वॉरंट जारी होतील. ८०० अतिरेक्यांना फाशी झालेली आहे. तालिबान्यांशी आता चर्चा नव्हे, फक्त कारवाई होईल, असे पाकने सांगितले. दरम्यान, दिल्लीत हल्ले होण्याचा इशारा गुप्तचरांनी दिला. त्या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट जारी झाला आहे.

भारतात शोकसंवेदना : भारतातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून पाकिस्तानी चिमुरड्यांना श्रद्धांजली व बालसंहाराचा निषेधही केला.

हाफिज आणि दाऊदला पकडा, तेव्हाच तुमचा संताप खरा वाटेल
नवाझ व त्यांचे लष्कर सर्व अतिरेक्यांवर कारवाई करू इच्छितात की फक्त तालिबानवर? कारण, आज दोन सर्वात मोठे दहशतवादी हाफिज सईद व दाऊद इब्राहिम पाकच्याच छत्रछायेत आहेत. पाक सरकार आजही त्यांना "समाजसेवक' मानते. पाकला खरोखरच दहशतवादापासून मुक्तता हवी असेल तर आधी त्याला हाफिज-दाऊदपासून मुक्त व्हावे लागेल. (हे विचार आहेत भास्कर समूहाच्या वाचकांचे, त्यांनी ते फेसबुक पेजवर पोस्ट केले आहेत.)

तालिबानी चांगला-वाईट नाही, सर्वच एकजात दहशतवादी आहेत. मृत निरागसांचे चेहरे डोळ्यांसमोर ठेवून दहशतवाद्यांचा नि:पात करू.
- नवाझ शरीफ, पाक पंतप्रधान

पाकिस्तान : गल्लीबोळात संताप, दु:ख, पश्चात्ताप आणि अश्रूच अश्रू....
माझ्या शिक्षिकेचे शेवटचे शब्द होते - रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुले मी पाहू शकत नाही
आमची शिक्षिका अतिरेक्यांशी भिडली होती. त्या म्हणाल्या की,‘मला मारल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.’अतिरेक्यांनी मॅमला जाळून टाकले. पण त्यांचे शेवटचे शब्द होते-‘मी माझ्या विद्यार्थ्यांना रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले कधीच पाहू शकत नाही’
- इरफान, १० वीचा विद्यार्थी
पुढे वाचा 9 वीच्या दाऊद, एहसान या विद्यार्थ्‍यांनी अनुभवलेला थरार आणि सईदच्या उलट्या बोंबाविषयी..