फोटो: फ्लाइंग कार एरोमोबिल
स्लोवाकिएन (Slovakian) नावाची कंपनीने हवेत हवेत उडणारी कार तयार केली आहे. 'एरोमोबिल' (AeroMobil) नामाची ही कार प्रति टँक पेट्रोलमध्ये 430 मैल (645 किमी) पर्यंत उडाण करु शकेले. त्यामुळे ट्राफीकमध्ये अडकण्याचे दिवस लवकरच जाणार असल्याचे बोलले जात आहे.
कंपनी 29 ऑक्टोबरला ऑस्ट्रियामध्ये 'पायोनियर्स फेस्टिव्हल' मध्ये या कारला लॉन्च करणार आहे. मात्र आतापर्यंत या कारच्या किंमतीबाबत खुलासा केला नाही. यावेळी एरोमोबिल कंपनीचे प्रवक्ते तेतिएना वेबर यांनी म्हटले की, "आम्ही फ्लाइंग कार संकल्पनेवर 1990 पासून काम करत आहोत. आमचे पहिले मॉडेल दररोजच्या वापरायोग्य नव्हते. यानंतर आम्ही हे मॉडेल बनविले आहे. हे मॉडेल अगदी परफेक्ट आहे. "
उल्लेखनिय म्हणजे ही कार तात्काळ पार्क केल्या जावू शकते. तिचे फोल्ड होणारे विग्स (पंख) तिला कारच्या आकारात बनवतात. एरोमोबिल, थर्ड जेनरेशनचे लेटेस्ट वर्जन आहे.
कारचे विशेष
- कारमध्ये रोटॅक्स 912 इंजन वापरण्यात आले आहे.
- कार 200 किमी/तास गतीने उडू शकते.
- एरोमोबिलची टेक ऑफ स्पीड 130 किमी/तास आहे.
- ही टू सीटर फ्लाइंग कार आहे.
- हवेत उडाण करण्यासाठी तिला प्रति तास 15 लीटर पेट्रोल लागते.
- जमीनीवरील प्रवासासाठी ती प्रति 100 किमीला आठ लीटर पेट्रोल लागते.
- कारचे वजन 450 किलोग्राम आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, हवेत उडणा-या कारचे काही निवडक छायाचित्रे..