आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत गोळीबार; बंदूकधा-यासह पाच जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोगलसविले - अटलांटा उपनगरातील एका घरातील गोळीबार प्रकरणात बंदूकधा-यासह पाच जण ठार तर दोन मुले जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पश्चिम अटलांटाच्या दोन मजली घरात एका बंदूकधा-याने गोळीबार केल्याचे डग्लस काउंटीचे शेरीफ लेफ्टनंट जनरल डॅनियल यांनी सांगितले. एक व्यक्ती घरात शिरला आणि त्याच्या घटस्फोटित पत्नीवर व मुलांवर गोळीबार केला. घटनेनंतर बंदूकधा-याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघांनी घटस्फोट कधी घेतला तसेच त्याच्या कुटुंबीयाने पोलिसांशी संपर्क साधला होता काय याची प्राथमिक माहिती समोर आलेली नाही.

गेल्या २० वर्षांपासून सुरक्षा क्षेत्रात काम करत आहे. मात्र, आजच्यासारखी घटना यापूर्वी पाहिली नसल्याची प्रतिक्रिया डॅनियल यांनी दिली.

गोळीबाराचा आवाज ऐकून शेजा-यांनी मदतीसाठी धाव घेतली. काही जणांवर घरात तर काहींना घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी मृतांची व हल्लेखोराचे नाव अद्याप उघड केले नाही.गोळीबारामागे नेमका हेतू स्पष्ट झाला नाही. घटनास्थळापासून जवळच राहत असलेल्या केन्या बेयाह म्हणाल्या की, संबंधित कुटुंबाची माहिती नाही, परंतु घराच्या अंगणात मुले खेळताना नेहमी पाहत होते.