आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलच्‍या नाईट क्‍लबमध्‍ये भीषण आग, 245 जण ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साओ पाउलो - ब्राझीलच्या सांता मारिया शहरात शनिवारी रात्री उशिरा नाइट क्लबला लागलेल्या आगीत 245 नागरिक ठार झाले. किस नाइट क्लबमध्ये पायरोटेक्निक शो सुरू असताना ही दुर्घटना घडली. कार्यक्रमावेळी जवळपास 500 नागरिक उपस्थित होते. दुर्घटनेचे कारण कळू शकले नाही, असे पोलिस प्रवक्ते सॅद्रो मिर्नेज यांनी सांगितले.

ब्राझीलच्या राष्‍ट्राध्यक्ष डिल्मा रॉसेफ चिली दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतल्या आहेत. कार्यक्रमादरम्यान एका कलाकाराने आगीच्या ज्वाळा तयार केल्या. यानंतर ही आग छतापर्यंत पोहोचली. काही कळायच्या आत संपूर्ण क्लबमध्ये आग पसरली. आग एवढी वेगाने पसरली की क्लबमधून धूर आणि आगीचे लोट बाहेर निघत होते. क्लबमधून बाहेर पडण्यासाठी रस्ता नव्हता. यादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याने श्वास गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला. जखमींना घटनास्थळी उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांचे पथक पाठवण्यात येत आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री सिमरो सिमोनी यांनी सांगितले.

पायरोटेक्निक शो दरम्यान दुर्घटना
पायरोटेक्निक शोमध्ये संगीताच्या तालावर आतषबाजी होते. त्यासाठी विविध प्रकारच्या रसायनांचा वापर केला जातो.
पायरोटेक्निक शो व दुर्घटना
2000 : नेदरलॅँडमध्ये एसई फायरवर्क्स डेपोत आग. शोमध्ये 23 लोक ठार, 947 जखमी. 2000 घरे जळाली.
2003 : रोडे बेटावरील नाइट क्लबला आग लागली. 100 लोकांचा मृत्यू.
2004 : अर्जेंटिनाच्या रिपब्लिक क्रोमॅग्न नाइट क्लबमध्ये आग. 194 नागरिकांचा मृत्यू.

या भीषण घटनेची काही छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...