आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरावर अल्कोहोल पेटवून घेण्याची अजब उपचार पद्धती, वाचा फायर थेरपीविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये उपचारांसाठी एक निराळीच पद्धत प्रचलित झाली आहे. येथे रुग्णांचा उपचार फायर थेरपीने करण्यात येत आहे. वैद्यक शास्त्रामध्ये या उपचार पद्धतीला मान्यता नाही. परंतु चिनी माध्यमांत या उपचार पद्धतीची सध्या चर्चा होत आहे. देशाच्या काही भागात याचा अवलंबही होत आहे.
चिनी फायर थेरपी
उपचार पद्धती : या उपचारांदरम्यान रुग्णाला एका खाटेवर झोपवले जाते. त्याच्या संसर्ग झालेल्या भागाला हर्बल लेप लावला जातो. त्यावर जाड टॉवेल लपेटण्यात येतो. या टॉवेलवर पाणी टाकून त्यावर अल्कोहोल टाकून पेटवले जाते.
या उपचार पद्धतीविषयी दावे
ही पद्धत चिनी व पाश्चात्त्य चिकित्सा पद्धतींपेक्षाही प्रभावी असल्याचा दावा बीजिंगमध्ये हा उपचार देणारे झांग फेंग्हो यांनी केला आहे. यात तणाव, अपचन, वंध्यत्व व कर्करोग यासारख्या आजारांवर रामबाण उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
*100 वर्षांपेक्षा जास्त जुनी पद्धती.
*48 डॉलर ताशी खर्च
*10 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या उपचारांचे प्रशिक्षण घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा फायर थेरपीची छायाचित्रे....