आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील कॉलेजमध्ये गोळीबार, 2 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील शालेय हिंसाचाराच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. केंटकी कम्युनिटी कॉलेजमध्ये बुधवारी एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात 2 जण ठार झाले. परंतु गोळीबाराचा संबंध शैक्षणिक गोष्टींशी नाही. घरगुती कारणावरून एका व्यक्तीने महाविद्यालयात बेछूट गोळीबार केला, अशी प्राथामिक माहिती असल्याचे पोलिस प्रमुख मिनर अँलन यांनी सांगितले. मृतांमध्ये 50 वर्षीय पुरूष आणि 20 वर्षीय तरूणीचा समावेश आहे. घटनेत किशोरवयीन मुलगी जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉल्टन स्टीधाम (21) असे या हल्लेखोराचे नाव आहे.