आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी मॉलमध्ये तुफान गोळीबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरामस (अमेरिका)- अमेरिकेतील उत्तर न्यूजर्सी प्रांत मंगळवारी गोळीबाराने हादरला. बर्गन काउंटीमधील एका मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोराने हा हल्ला केला. सुदैवाने यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. हल्लेखोर मॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आला.

हल्लेखोराने लक्ष्य केलेल्या मॉलचे नाव गार्डन स्टेट प्लाझा असे आहे. सोमवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. मॉल बंद करत असताना साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळी उशिरापर्यंत हल्लेखोर मॉलमध्ये दडून होता, परंतु रात्री उशीरा तो मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती. हा मॉल 2 लाख चौरस मीटर क्षेत्रफळ भागात पॅरामस येथे आहे. संशयित काळ्या रंगाच्या कपड्यात असून त्याने हेल्मेट परिधान केले होते. त्याच्याकडील शस्त्र अद्याप जप्त करण्यात आले नसल्याचे बर्गन काउंटी पोलिसांकडून सांगण्यात आले. मॉलमधून गोळीबाराची माहिती मिळताच काही वेळात सुरक्षारक्षक शेकडोंच्या संख्येने तेथे दाखल झाले. अशी माहिती पोलिसांनी दिली.