आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Firing In Pakistan, Agitation Against PM Nawaj Sharif

शरीफविरोधी आंदोलकांवर पाकमध्ये गोळीबार, सात ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानमधीलनवाज शरीफ सरकारवरील संकट अधिक गडद झाले आहे. पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अडून बसलेल्या हजारो आंदोलकांनी शनिवारी रात्री उशीरा त्यांचे निवासस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीमारही केला. त्या लाठीमारात जण ठार तर ४५ जण जखमी झाले. त्यात अनेक महिलांचाही समावेश आहे.

इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ मौलवी ताहीर उल-कादरी यांचे समर्थक दोन आठवड्यांपासून नॅशनल असेंब्लीजवळ ठाण मांडून बसले होते. त्यांच्याशी लष्कर मध्यस्थी करत होते. कादरी यांनी शनिवारी शरीफांना राजीनाम्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. त्यानंतर आंदोलकांनी शरीफांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. बॅरिकेटड्स तोडून ते बंगल्यापासून ५०० मीटरवर पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला आणि आंदोलक सैरावैर पळत सुटले.