आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Firing On Pakistan Airlines Plane At Peshawar Airport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकमध्ये लँड होताना विमानावर गोळीबार, नजीकच्या निवासी भागातही झाडल्या गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानमध्ये विमान उतरत असताना जमिनीवरून हवेत करण्यात आलेल्या गोळीबारात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यात चालक दलाचे दोन सदस्य वाजीद आणि एजाज हेही जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

यापूर्वी कराची विमानतळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 29 लोकांचा मृत्यू झाला होता. या वेळी रियादहून पेशावर आलेल्या पाकिस्तान एअर लाइन्सच्या बोइंग विमानाला लक्ष्य करण्यात आले. विमानतळ परिसराला लागून असलेल्या तहखाल वसाहतीमधून एके 47 मधून विमानाच्या दिशेने आठ गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबार झाला तेव्हा हे विमान जमिनीपासून 250 ते 300 फूट उंचीवर होते. विमानाच्या पाठीमागच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या. विमानाला गोळी लागलेली असतानाही वैमानिक कॅप्टन तारिक चौधरी यांनी हे विमान सुरक्षित उतरवले, त्यामुळे मोठा अपघात टळला, असे चालक दलाचे सदस्य वाजीद यांनी सांगितले. पेशावरहून हे विमान पुढे सियालकोटला जाणार होते पण गोळी लागल्यामुळे त्याचा पुढचा प्रवास रद्द करण्यात आला.

विमानात 178 प्रवाशी
गोळीबार झालेल्या विमानात 178 प्रवाशी होते. त्यातील एकाच महिला प्रवाशाला गोळी लागली. चालक दलाचे अन्य सदस्य ऐजाज यांना तीन गोळ्या लागल्या. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

सुरक्षा वाढवली
या हल्ल्यानंतर पेशावर विमानतळा भोवतालची सुरक्षा वाढवण्यात आली असून विमान सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

प्रवासी घाबरले पण...
गोळीबारानंतर विमानातील प्रवासी घाबरले आणि आकांत करू लागले तरीही वैमानिकाने जराही विचलित न होता गोळी लागलेले विमान कौशल्य पणाला लावून शिताफीने उतरवले.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पाकिस्तानमध्ये कराची विमानतळावर सलग दोन वेळा दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्या पाठोपाठ पेशावरमध्येही हल्ला झाल्याने पाकिस्तानमधील विमाने आणि विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.