आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले 18 महिने बाळासाठी महत्त्वाचे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आई आणि मूल यांच्यातील नाते हेच बाळाच्या भावी आयुष्याला ख-या अर्थाने आकार देणारे ठरते. आईच्या प्रेमामुळे मुले पुढे भावनिकदृष्ट्या स्वत:ला सुरक्षित समजतात. त्याचबरोबर इतरांशी कसे वागावे, याचेही भान त्यांना राहते. म्हणूनच सुरुवातीचा 18 महिन्यांचा काळ त्यादृष्टीने महत्त्वाचा असतो, असे संशोधनात म्हटले आहे.
मिनेसॉटा विद्यापीठाच्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या अठरा महिन्यांत आईकडून चुकीची वागणूक मिळाली तर मुले मोठेपणी भांडखोर, वाद घालणारी होतात. आपल्या जोडीदारासोबत एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करताना सहकार्याची भूूमिका ठेवणारी आई मुलासाठी निश्चितच आदर्श ठरते. त्यातूनच परस्परांवर विश्वास, प्रेम या मूल्यांची रुजवणूक होत असते.
मोठेपणी मुलांचा मेंदूही विकसित झालेला असतो. अधिकाधिक माहिती ते गोळा
करतात. त्यातून ती आणखी बिघडण्याची शक्यता असते; परंतु आईचे मुलांसोबत सुरक्षित भावबंध असतील, तर भावी आयुष्यात ही मुले भावनिक पातळीवर समाधानी राहतात, असे प्रोफेसर जेफ्री सिमसन यांनी म्हटले आहे. संशोधकांनी तिशीच्या आतील मातांचा त्यासाठी अभ्यास केला. कमी उत्पन्न गटातील मातांचा अभ्यास करून 75 मुलांचे विश्लेषण करण्यात आले.