आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Aids Patient In Kinshasa City News In Divya Marathi

किन्शासामध्ये एड्स सर्वप्रथम आढळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - संशोधकांनी एड्सची उत्पत्ती कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम झाली, याचा मागमूस काढला आहे. किन्शासा शहरात हा विषाणू सर्वप्रथम आढळल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हे शहर कांगो गणराज्यात आहे. या असाध्य रोगाने सर्व जगाला कवेत घेतले असून आता याला ३० वर्षे होत आहेत.
या व्हायरसच्या जेनेटिक कोड नमुन्यांचे विश्लेषण वैज्ञानिकांनी केले आहे. देहविक्रीच्या व्यवसायाचे सार्वत्रिकीकरण, लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ व रुग्णालयातील इंजेक्शनची सुई यातून हा विषाणू वेगाने फैलावला. १९८० च्या दशकात याचे प्रथम निदान झाले. आज ७.५ कोटी लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. ऑक्सफर्ड आणि बेल्जियमच्या ल्युवेन विद्यापीठातील संशोधकांनी एचआयव्हीच्या ‘फॅमिली ट्री’ची पुनर्रचना करण्याचा प्रयोग केला आहे. वैज्ञानिकांच्या मते, चिंपांझी व्हायरसचे परिवर्तित रूप म्हणजे एचआयव्ही. यालाच ‘समियन इम्युनोडिफिशिएन्सी व्हायरस’ असेही संबोधले जाते. किन्शासा येथे बुशमीटचा (जंगली प्राण्यांचे मांस) मोठा बाजार होता. येथूनच रक्तातून संक्रमित होऊन एचआयव्हीचे संक्रमण मानवात झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वैज्ञानिकांनी काढला आहे,असे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रा. ऑलिव्हर पाइबस यांनी सांगितले.
असे झाले संक्रमण
एचआयव्ही चिंपांझी, गोरिला, माकड यांच्यात फैलावल्यावर मनुष्यात आला. एचआयव्ही-१ सबग्रुप ‘ओ’चे संक्रमण कॅमरूनमध्ये लाखो लोकांना झाले. एचआयव्ही-१ सबग्रुप ‘एम’ चे जगाच्या प्रत्येक भागात संक्रमण झाले. १९२० मध्ये किन्शासा बेल्जियन कांगोतील एक प्रांत होता. आधुनिकीकरणही वेगाने होत गेले. येथे पुरुषांच्या येण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे स्त्री-पुरुष संख्येत विषमता आली. वेश्यावृत्ती बळावली. त्यामुळे एचआयव्हीचा प्रसार वेगाने झाला. वैद्यकीय शिबिरांतून इंजेक्शनच्या फॅमिजने तर विषाणूला पंखच फुटले.