आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • First Anniversary Of Curiosity Rover Landing On Mars

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्यूरिऑसिटीने वर्षभरात कापले एक मैल अंतर, उद्देश सफल- नासाचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या रोव्हर क्यूरिऑसिटी यानाला 6 ऑगस्टला एक वर्ष पूर्ण झाले आहे. दोन वर्षे मंगळावर राहाणा-या क्यूरिऑसिटीला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अतिशय धिम्या गतीने चालणा-या या यानाने एका वर्षात एक मैल पेक्षा जास्त अंतर कापले आहे. क्यूरिऑसिटी यानाने मंगळावर जिथे लँडिग केली होती तेथून माउंट शार्प 4.4 मैल अंतरावर आहे. मंगळ ग्रहावरील एक दिवस पृथ्वीच्या तुलनेत 40 मिनिट अधिक असतो.

नासाने दावा केला आहे, की क्यूरिऑसिटीने त्याचा मुख्य उद्देश पूर्ण केला आहे. नासाचा माहितीनुसार मंगळ ग्रहावर कधीकाळी जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण होते.

6 ऑगस्ट 2012 रोजी मंगळ ग्रहावरील क्रेटरवरील लँडिगनंतर आता पर्यंत क्यूरिऑसिटीकडून 190 गीगा बाइट्स डाटा पाठविण्यात आला आहे. त्यात 36,700 पूर्ण छायाचित्र आणि 35000 थंबनेल छायाचित्रे आहेत. त्यासोबत 75 हजार लेजर शॉट्सही मिळाले आहेत. त्यांच्या मदतीने मंगळावरील खडक आणि मातीचे विश्लेषण केले जात आहे.

छायाचित्र - वर्षभरापूर्वी क्यूरिऑसिटीच्या मंगळावरील यशस्वी लँडिगनंतर कॅलिफॉर्नियाच्या पॅसाडेनामध्ये आनंद साजरा करताना मंगळ विज्ञान प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ.