आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
वर्षाच्या सुरुवातीलाच अॅस्टन मार्टिन कारला शंभर वर्षेपूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करण्यात आला. तसेच व्ही 8 व्हिंटेज, डीबी 9 आणि व्हँक्विश श्रेणीतील मर्यादित गाड्या लाँच करण्यात आल्या. आता या सेलिब्रेशनमध्ये एक नवा अध्याय समाविष्ट झाला आहे. दुबईमधील बुर्ज अल अरबच्या हेलिपॅडवर प्रथमच कार उतरवण्यात आली. 1000 फूट उंचीवरील बुर्जच्या या हेलिपॅडवर उतरणारी अॅस्टन मार्टिन ही पहिली कार आहे. हवेत लटकणारी कार हेलिपॅडवर उतरवतानाचे दृश्य रोमांचक होते. अॅस्टन मार्टिन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उलरीच बॅज म्हणाले की,‘आज आम्ही आणखी एक यश मिळवले आहे. पहिल्यांदाच या हेलिपॅडवर कार उतरवण्यात आली आहे. आमच्या ग्लोबल ब्रँडचे आयकॉनिक यश साजरे करण्याची यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. काही खास लोकांसाठी ही कार तिथपर्यंत आणण्यात आली आहे. अशा प्रकारच्या लक्झरी स्टंटसाठी दुबईत यापेक्षा चांगली जागा नव्हती.’
luxurylaunches.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.