आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्या डिजिटल मेंदूद्वारे मानसिक आजाराचा अभ्यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - मानसिक आजाराचे कोडे उलगडण्यासाठी शास्त्रज्ञ जगातील पहिला डिजिटल मेंदू विकसित करत आहेत. दहा वर्षांच्या या प्रोजेक्टमध्ये मानुष्याच्या सर्व 100 अब्ज न्यूरॉन्सचे 1 लाख अब्ज सिनाप्सेससोबतचे जाळे (दोन नर्व्ह सेल्स तसेच नर्व्ह सेल्स व मांसपेशी, ग्रंथीच्या पेशींना जोडणारा घटक) एका संगणक प्रणालीमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संशोधनातून अल्झायमरसारख्या आजारामागची कारणे कळू शकतील, असे दक्षिण आफ्रिकेतील न्यूरोसायंटिस्ट प्रो. हेन्री मार्करम यांनी सांगितले.

मेंदूचा खोलात अभ्यास करण्यासाठी आम्ही पाया रचत आहोत. यामुळे प्रत्येक रोगावर योग्य दृष्टिकोनातून संशोधन करता येईल, असे मार्करम म्हणाले. मार्करम यांनी या प्रोजेक्टसाठी युरोपीय युनियनसाठी 12 अब्ज दक्षिण आफ्रिकी रेंडचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. स्वित्झर्लंडमधील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यासाठी सुपरकॉम्प्युटर विकसित करण्यात आले आहे. मार्करम यांच्या मुलाला स्वमग्नतेचा विकार आहे. नव्या संशोधनामुळे या आजारावर उपचार करणे आहे. मार्करम यांच्यासोबत 200 संशोधक काम करणार असून प्रोजेक्ट 10 वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.