आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • First Female UAE Pilot Lead Air Strike On ISIS In Iraq

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS वर हवाई हल्ले करणारी अमिरातची पहिली महिला पायलट मेजर मरियम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(F-16 लडाऊ विमानाच्या कॉकपिटमध्ये मेजर मरियम अल मंसूरी.)
ISIS वर अमेरिकेसह संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, जॉर्डन, कतार आणि बहरीन या देशांनीही हवाई हल्ले करण्यास सुरवात केली आहे. सीरियात ISIS या सुन्नी दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांवर हल्ले केले जात आहेत. अरब अमिरात येथील पहिली महिला वैमानिक मेजर मरियम अल मंसुरी यांनी गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचे नेतृत्व केले होते.
कोण आहे मरियम
35 वर्षिय मेजर मरियम अल मंसुरी संयुक्त अरब अमिरातची पहिली महिला पायलट आहे. तिचा जन्म अबुधाबीमध्ये झाला. तिला एकूण आठ भावंडे आहेत. तिच्या करिअरचे श्रेय ती तिच्या आई वडीलांना देते.
लढाऊ विमान उडवण्याची इच्छा
मरियमला लहानपणापासून लढाऊ विमान उडवण्याची इच्छा होती. पदवी मिळाल्यावर तिला लढाऊ विमानाचे वैमानिक व्हायचे होते. तिची एक बहिण क्वालिफाइड A320 फर्स्ट ऑफिसर आहे तर भाऊ अलि अल मंसूरी अबुधाबी पुलिस विभागात हेलिकॉप्टर वैमानिक आहे.
मिळाला सर्वोच्च सन्मान
मरियमला याच वर्षी प्राइड ऑफ द अमिरात मेडलने गौरविण्यात आले. अमिरात या देशातील हा सर्वोच्च सन्मान आहे. दुबईचे शासक आणि उपराष्ट्रपती शेख मोहंमद बिन राशिद यांनी तिला हा पुरस्कार प्रदान केला होता.
येथे घेतले प्रशिक्षण
मरियमने 93 टक्क्यांसह इंग्रजी विषयात डिग्री घेतली आहे. युएसई विद्यापिठातून तिने पदवी घेतली आहे. 2007 मध्ये जाएद एयर कॉलेजमधून तिने ही पदवी घेतली होती. ती एक कुशल वैमानिक आहे.
तिच्यासंदर्भात अमेरिकेचे युएईचे राजदूत युसूफ अल ओतैबा यांनी सांगितले आहे, की सोमवारी रात्री करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याचे नेतृत्व मरियमने केले होते, हे मी विश्वासाने सांगू शकतो. ती एक उच्च श्रेणीचे लढाऊ वैमानिक आहे.
पुढील स्लाईडवर बघा वैमानिक मरियमची छायाचित्रे....