आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Lady Michelle Obama Shares Her Diet And Workout Secrets

अमेरिकी तरुणांनो योगासने शिकून हेल्दी व्हा!, मिशेल ओबामा यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - कॅलिफोर्नियात योगा शिकवण्यास विरोध होत असला तरी अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी मात्र त्याचे जोरदार समर्थन केले आहे. योगा शिकून आरोग्यदायी जीवनशैली बनवा, असे मिशेल ओबामा यांनी म्हटले आहे.
व्हाइट हाऊसमध्ये ईस्टरच्या निमित्ताने आयोजित समारंभात योगाच्या सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. ‘बी हेल्दी, बी अ‍ॅक्टिव्ह, बी यू’ अशी समारंभाची संकल्पना होती. या वेळी हजारो लोकांनी समारंभाला हजेरी लावली होती. सर्वांचे प्रेमाने स्वागत करताना मिशेल म्हणाल्या, तरुणांचे आयुष्य अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आम्हाला वाटते. लहान मुलांनाही त्यांनी कानगोष्टी सांगितल्या. भाज्या भरपूर खा. ओके ? अशी प्रेमळ सूचना त्यांनी केली.
राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी या वेळी हजेरी लावली होती. तुम्हाला पाहून आनंद वाटला. सकाळी वातावरण चांगले नव्हते; परंतु आता ते छान झाले आहे, असे सांगून समारंभ उत्साहाने साजरा करण्यासाठी ओबामा यांनी शुभेच्छा दिल्या.

साऊथ लॉन बहरली
व्हाइट हाऊसच्या दक्षिण हिरवळीवर दरवर्षी ईस्टर साजरा केला जातो. यंदाचे त्याचे 135 वे वर्षे होते. त्याच हिरवळीवर 30 हजार लोकांनी या समारंभात हजेरी लावली होती. हिरवळीवर अनेक विभागांत कार्यक्रम होत असल्याने नागरिकांना त्याची माहिती खुद्द मिशेल यांनी दिली.

योगा गार्डन
व्हाइट हाऊसवर योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी योगा गार्डन हा विभाग तयार करण्यात आला होता. तेथे व्यावसायिक प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. लेह कुलीस यांच्याकडून नागरिक योगाचे प्रशिक्षण घेत असताना दिसत होते.

लठ्ठ मुले
मुलांमध्ये वाढणार्‍या लठ्ठपणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 2010 पासून लेट्स मूव्ह नावाचे अभियान राबवले जाते. मिशेल या अभियानाच्या प्रमुख आहेत. या अभियानात समुदायातील नेते, शिक्षक, डॉक्टर, नर्स, माता-पिता यांना सहभागी करून घेतले जाते.