आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Now Husband & Husband... ब्रिटनमध्ये पार पडले पहिले गे मॅरेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनमधील गे कपल्सला अधिकृतरीत्या लग्न करण्यासाठी अनेक दशके वाट बघावी लागली. जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा अगदी काही मिनिटांत गे लग्न सोहळा पार पडला.
लंडनमधील रहिवासी सिआन अदल-तबताबाई आणि सिनक्लेअर ट्रेडवे यांचे ब्रिटनच्या इतिहासातील पहिले गे लग्न पार पडले. आजपासून (शनिवार) ब्रिटनमध्ये गे मॅरेज अॅक्ट लागू झाला. त्यानंतर अगदी काही मिनिटांत या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लंडनमधील कॅमडेन टाऊन हॉलमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्याला 100 पाहुणे उपस्थित होते. रात्रीच्या सुमारास हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मध्यरात्र होऊन दहा मिनिटे झाल्यानंतर जोडिदारांनी एकमेकांचे चुंबन घेत लग्नाची इच्छा जाहीर केली. त्यानंतर कौटुंबीक न्यायालयातील अधिकारी म्हणाले, की आता तुम्ही हजबंड आणि हजबंड आहात.
यापूर्वी ब्रिटनमध्ये गे लग्नाला आणि संबंधांना विरोध करणारा कायदा होता. आता त्यात बदल करण्यात आला असून आजपासून अशा संबंधांना कायदेशीर दर्जा देण्यात आला आहे.