आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

96 व्या वर्षी लिहिलेल्या पहिल्याच गाण्‍याला प्रचंड लोकप्रियता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमेरिकेतील इलिनॉय प्रांताच्या पूर्वेकडील पिओरिया शहरातील 96 वर्षांच्या फ्रेड स्टोबॉह यांनी पूर्वी कधीही गाणे गायले नव्हते किंवा एखादे वाद्यही वाजवले नव्हते; पण 75 वर्षांच्या पत्नीच्या म्हणजेच लॉरीनच्या मृत्यूनंतर तिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांनी एक गाणे लिहिले. फ्रेड यांनी ते गाणे एका स्पर्धेत पाठवले. हजारो ई-मेल्समध्ये आयोजकांना फ्रेड यांच्या गाण्याचाही मेल मिळाला. गाण्याच्या शब्दांमुळे स्पर्धेचे आयोजक, ग्रीन शू स्टुडिओचे मालक जॅकब कॉल्गेन खूपच भावूक झाले. गाण्यामागील कथा जाणून घेण्यासाठी त्यांनी फ्रेड यांची भेट घेतली. पत्नीविषयी विचारले असता फ्रेड यांनाही भावना लपवणे अशक्य झाले. त्यांचे डोळे पाणावले. त्या भेटीनंतर फ्रेड यांनी लिहिलेले ‘ओह स्वीट लॉरेन’ हे गाणे व्यावसायिक पातळीवर रेकॉर्ड करण्याचे आयोजकांनी ठरवले. आय-ट्यूनवर हे गाणे ऐकता येईल.
B today.com