आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंतराळातून ध्वनिमुद्रित केले पहिलेच गाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यूयॉर्क - पृथ्वीपासून 402 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रातील कॅनडियन अंतराळवीर क्रीस हॅडफिल्ड आणि बेअरनेकेड लेडीज या प्रसिद्ध बँडची गायिका एड रॉबर्टसन यांनी मिळून एक गाणे लिहिले आणि ते ध्वनिमुद्रितही करण्यात आले आहे. अंतराळात लिहिलेले आणि ध्वनिमुद्रित केलेले अशा प्रकारचे हे पहिलेच गाणे ठरले आहे. टोरँन्टो येथील स्टुडिओमध्ये उपग्रहाच्या साह्याने हे गाणे ध्वनिमुद्रित करण्याआधी या दोघांनी मिळून हे गाणे लिहिले आहे. ‘इज समबडी सिंगिंग...’ या गाण्यामध्ये पृथ्वीवरील आपल्या प्रियजनांपासून दूर अंतराळात राहणा-या व्यक्तीचे अनुभव आणि घालमेल व्यक्त करण्यात आली आहे.

पाच महिन्यांच्या अंतराळ मोहिमेसाठी अंतराळवीर क्रीस हॅडफिल्ड यांचे रशियामध्ये प्रशिक्षण सुरू असताना त्यांनी आणि रॉबर्टसन यांनी संयुक्तपणे गाणे लिहिण्याचे निश्चित केले होते. या आठवड्याच्या प्रारंभी बेअरनेकेड लेडीज बँड आणि वेक्सफोर्ड ग्लीक्स या तरुणांच्या बँडच्या सदस्यांनी मिळून गायिलेल्या या गाण्याचे ध्वनिमिश्रण करण्यात आले. हॉडफिल्डने कुपोला या आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या निरीक्षणगृहातून सहभाग घेतला. हातात गिटार धरलेल्या हॉडफिल्डने ‘वेलकम टू कुपोला. आय अ‍ॅम रेडी टू प्ले अ लिटिल म्युझिक’ अशा संवादाचा व्हिडिओ या गाण्यात मिक्स करण्यात आला आहे.