आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Time An Indian Get Peace Nobel Prize 2014, Divya Marathi

भारतीयाला पहिल्यांदाच शांततेचे नोबेल पुरस्कार, कैलास सत्यार्थी ठरले मानकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओस्लो/नवी दिल्ली - नोबेल पुरस्कारांना सुरुवात होऊन तब्बल ११३ वर्षे उलटल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या भारतीयाची शांततेच्या नोबेलसाठी निवड झाली आहे. ‘बचपन बचाओ आंदोलना’च्या माध्यमातून गेली ३४ वर्षे संघर्ष करत असलेले कैलास सत्यार्थी यांना तो सन्मान मिळाला. यापूर्वी मदर तेरेसांना १९७९ मध्ये शांततेचे नोबेल मिळाले होते. तेव्हा त्या भारताबरोबरच अल्बानियाच्या नागरिकही होत्या.

सत्यार्थी व पाकिस्तानच्या मलाला युसूफझई यांना संयुक्तपणे हा पुरस्कार दिला जाईल. मलाला १७ वर्षांची आहे. शुक्रवारी पुरस्कारांची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटले की, सत्यार्थी यांनी गांधीजींचा वारसा चालू ठेवला आहे.
पुढे वाचा सत्यार्थी यांच्याविषयी..