आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावर सापडले बर्फाखाली नदीमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अंटार्क्टिकमधील बर्फाच्छादित प्रदेशात एका मोठ्या पट्ट्याखाली नदी असल्याचा दावा संशोधकांनी पहिल्यांदाच केला आहे. बर्फाच्या एका मोठ्या आच्छादनाखाली नदीचे उगम स्थळ आहे.


हिमसागरातील पाणी आच्छादनाखालील नदीच्या शुद्ध पाण्यात मिसळले जात असल्याचे आढळून आले आहे. हा भाग पश्चिम अंटार्क्टिका प्रदेशात येतो. त्याठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणाचे दर्शन आपल्याला चकित करून टाकते, असे रिचर्ड अ‍ॅली यांनी सांगितले. पेन विद्यापीठात ते हिमशास्त्र विभागातील संशोधक आहेत. तेथे बर्फाची नदी दिसून येते, परंतु येथील प्रवाह मात्र अतिशय वेगवान आहे. त्याचे पात्र सुमारे एक किलोमीटर रुंद आहे. रॉस सागरापासून व्हिलान्स तलावाच्या दिशेने ही नदी वाहते. त्याची खोली सुमारे 7 मीटर आहे. याच वर्षी संशोधकांनी एक दावा केला होता. हिमसागरातील एक भाग पूर्णपणे नदीच्या पाण्यावर तरंगत आहे. त्याचा जमिनीशी संपर्कच तुटलेला आहे.