आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Tuna Sells In New Year At Japan Fish Market

PHOTOS: लक्झरी कारच्या किंमतीत विकला गेला हा मासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: ब्लूफ‍िन टूनाबरोबर जपानचे सुशी रेस्तरॉं साखळीचे अध्‍यक्ष कियोशी किमुरा.
टोकियो - जपानमधील टोकियोच्या प्रसिध्‍द मच्छी मार्केटमध्‍ये वर्षातील सुरुवातीचे लिलाव चांगले झाले. सोमवारी(ता.पाच) झालेल्या लिलावात ब्लुफ‍िन टूनाचा ( एक मासाचा प्रकार) 24 लाख रुपये मिळाले. या चारशे पौंड ( 180 किलो) ब्लूफ‍िनची खरेदी जपानच्या सुशी रेस्तरॉं साखळीचे अध्‍यक्ष कियोशी किमुरा यांनी केली. किमुरा म्हणतात, की यंदा मासांचे दर खूप जास्त असतील. पण लिलावात मासांचा आवाक जास्त होती. नव वर्षात लिलाव करणे ही जपानमध्‍ये एक परंपरा बनली आहे. तसेच ती येथील मच्छीमारी उद्योगाच्या कालदिनदर्शिकेतील महत्त्वाची तारिख आहे. जागतिक तापमानामुळे टुना नष्‍ट होण्‍याच्या मार्गावर आहे.
गेल्या वर्षीपासून टुनाची विक्री मर्यादित करणे आणि त्यावर बंदी आणण्‍यासाठी प्रयत्न चालू आहे. पर्यावरणाच्या अभ्‍यासकांनुसार काही विशेष प्रजातींची संख्‍या दिवसेन् दिवस कमी होत आहे. नोव्हेंबर 2014 मध्‍ये इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेट‍िव्ह ऑफ नेचरने ब्लुफ‍िन ही प्रजाती नष्‍ट होण्‍याच्या मार्गावर असल्याची चिंता व्यक्त केली होती. यानंतरही उघडपणे त्यांचा लिलाव करण्‍यात येत आहे.

पुढे पाहा... टोकिओतील मच्छी मार्केटमधील टुनाच्या लिलावाची छायाचित्रे...