आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Turbaned Sikh Selected To Play Soccer In The NCAA D1

राजवीरसिंग काहलो, कॅनाडाच्‍या राष्‍ट्रीय फुटबॉल संघातील पहिला भारतीय 'सरदार'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओंकविले- 17 वर्षाच्‍या राजवीरसिंग काहलो याला कॅनडाच्‍या राष्‍ट्रीय फुटबॉल स्‍पर्धेत संधी मिळाली आहे. कॅनडाच्‍या नॅशनल कॉलेजिएट अ‍ॅथलीटीक असोसिएशन डी-1 साठी खेळल्‍या जाणा-या सामन्‍यासाठी या भारतीय सरदाराची निवड करण्‍यात आली आहे. राजीरसिंग लाहान असल्‍यापासूनच त्‍यांना मैदानी खेळामध्‍ये आवड होती.
फुटबॉल, बास्‍केटबॉल, बेसबॉल सारखे खेळ लहानपणी राजवीरसिंग खेळत असत. ओंटोरियोच्‍या आंडर 14 संघामध्‍ये राजवीरसिंग याची निवड झाली होती. या खेळात चांगली कामगिरी केल्‍यामुळे आंडर 16 वय असणा-या ऑंटोरियो युवा नॅशनल लीगसाठी निवड झाली. इंग्‍लडमध्‍ये झालेल्‍या आंतरराष्‍ट्रीय टुर्नामेंट 50 'बेस्‍ट प्लेअर मध्‍ये निवड करण्‍यात आली होती.
माझ्या बंधुमुळे, माझे स्‍वप्‍न पूर्ण झाले
मला चांगली ट्रेनिंग मिळावी यासाठी माझ्या मोठ्या भावाने 'युएस' मध्‍ये असणारे विविध क्‍लब आणि कोच यांना मेल करून चांगल्‍या खेळासाठी काय काय करता येईल यासाठी लागणारी सर्व माहिती माझ्यासाठी उपलब्‍ध करून दिली असल्‍याचे राजवीरसिंग यांनी सांगितले. ही निवड झाल्‍यानंतर चांगल्‍या खेळासाठी राजवीरसिंग यांनी पिट्बर्ग आणि मर्सर विद्यापीठामध्‍ये जाण्‍याचा धाडसी निर्णय घेतला. कारण पिट्सबर्गच्‍या क्‍यूबिक सॉकर क्लबने पगडीधारी युवकांना फुटबॉल खेळण्‍यास बंदी घातली होती. निवड चाचणीच्‍या वेळेस राजवीरसिंग यांना 'पगडी काढून' खेळ खेळावा लागला होता.