आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Woman Become Chief Of American Secreat Service

अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या गुप्तसेवा (सिक्रेट सर्व्हिस) विभागाच्या अध्यक्षपदी ज्युलिया पियर्सन यांची नेमणूक करण्यात आली आहे. एका महिलेची या पदासाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी पियर्सन यांच्या नेमणुकीची घोषणा केली. गेल्या वर्षी कोलंबियात सिक्रेट सर्व्हिसचे काही एजंट आणि वेश्यांमधील संबंधांचे प्रकरण घडल्यानंतर अध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अमेरिकेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या विभागातील सर्वांत गलिच्छ प्रकरण अशी कोलंबियातील प्रकरणाची संभावना केली जात होती. त्यावेळी मार्क सुलिव्हॅन विभागाचे अध्यक्ष होते. फेब्रुवारीत ते निवृत्त झाल्यानंतर आता पियर्सन या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. कोलंबियातील प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिक्रेट सर्व्हिस एक पुरुषसत्ताक संस्था असल्याची टीका देशभरातून केली जात होती. शिवाय, ओबामा यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या दुस-या सत्रात मोठ्या पदांवर महिलांची नेमणूक केलेली नाही, असाही आक्षेप घेतला जात होता. या टीकेला सामोरे जाण्यासाठीच ओबामा यांनी पियर्सन यांची नेमणूक केली असावी, असा कयास लावला जात आहे.