आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळलेल्या माशासाठी मालकाने बनवले लाइफ जॅकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाळीव प्राणी आपल्या परिवारातील सदस्यांप्रमाणेच असतात. त्यांना कसला त्रास होऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील असतो. असाच प्रयत्न एका छोट्या माशाकरिता तिच्या मालकाने केला. आइन्स्टाइन नावाचा मासा आजारी पडला. त्याला पोहता येत नव्हते. पोहण्याचा प्रयत्न करताच तो टँकच्या तळाशी जात असे. यामुळे तो मरेल असे वाटत होते. त्याचा त्रास इंग्लंडमध्ये ब्लॅकपूलचे रहिवासी लॅटन नॅलर यांना जाणवला. लॅटन यांनी त्या पाळलेल्या माशासाठी एक लाइफ जॅकेट तयार केले. त्याच्या मदतीने तो पोहू शकत होतो. लॅटननी आइन्स्टाइनच्या टँकमध्येही बदल केले. त्यामुळे त्याला पोहणे सोपे झाले. या फोटोला नेटवर खूप "लाइक' मिळाल्या.
amazingthings