आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेन संसदेत खासदारांमध्ये फ्री-स्लाइल; अनेक जखमी, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनमधील संसदेत मंगळवारी (8 एप्रिल) दोन प्रमुख पक्षांचे खासदार एकमेकांशी भिडले. खासदारांनी एकमेकांचे केस ओरबडले, एवढेच नव्हे तर तुफान हाणामारी झाली. यात अनेक खासदार जखमी झाले आहेत. फुटीरवाद्यांविरोधात कडक कायदा करण्याबाबत चर्चा सुरु असतानाच हा प्रकार घडला. युक्रेनच्या संसदेसाठी मंगळवार हा काळावार ठरला.

संसदेत राजनैतिक संकटावर चर्चा सुरु असताना कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदारांवर थेट आरोप केले. रशियाच्या दबाबाखाली राष्‍ट्रवादी पक्षाचे खासदार काम करत असल्याचा आरोप कम्युनिस्टच्या खासदारांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारावर हल्ला चढविला. दोन्ही पक्षांच्या खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात अनेक खासदार जखमी झाले.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, युक्रेन संसदेत खासदारांमध्ये फ्री-स्टाइल...