आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात \'अल कायदा\'च्या पाच दहशतवाद्यांना अटक; डॉकयार्डवर केला होता हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः अल कायदा इंडियाचे पाच दहशतवादी )

इस्लामाबाद- नुकतीच अस्तित्त्वात आलेली दहशतवादी संघटना 'अल कायदा इंडिया'च्या (AQIS) पाच दहशतवाद्यांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात अल कायदा इंडियाने पाकिस्तानी डॉकयार्डवर हल्ला केला होता. त्यात या पाचही दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

डॉकयार्डवर झालेल्या हल्ल्यात एक कर्मचार्‍याचा मृत्यु झाला होता तर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. कारी शाहिद उस्मान, असद खान, फवाद खान, शाहिद अंसारी आणि उस्मान अशी अटकेतील दहशतवाद्यांची नावे आहेत.

पाकिस्तानी वेबसाइट 'डॉन ऑनलाइन'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकार्‍यांनी कराचीमध्ये टाकलेल्या छाप्यात पाचही दहशतवाद्यांना अटक करण्‍यात आले. पोलिसांनी 10 किलो आरडीएक्स, दोन रायफल, तीन पिस्तूल आणि शेकडो काडतुसेही जप्त केली आहेत.

'अल कायदा' या दहशतवादी संघटनेने 20 सप्टेंबरला 'Al-Qaeda in Indian Sub-Continent' (AQIS) नामक एक शाखा भारतात सुरु केली आहे. या शाखेचे नेतृत्त्व अलीम उमर याच्याकडे सोपवण्यात आले आहे. वेबसाइट 'प्यू'ने दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

'अल कायदा'चा म्होरक्या अयमान अल जवाहिरीने 3 सप्टेंबर रोजी धमकीचा व्हिडिओ जारी केला होता. अल कायदाची नवी शाखा भारतात सुरु करण्यात येणार असल्याचे जवाहिरीने म्हटले होते. भारतात 13 टक्के मुसलमान असून जिहादचा झेंडा फडकवायचा असल्याचे जवा‍हिरी याने आपल्या 55 मिनिटांच्या व्हिडिओत म्हटले होते. अल कायदा आपला हेतु साध्य करण्यात अपयशी ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 'अल कायदा इंडिया'ने पाकिस्तानी डॉकयार्डयवर केला होता दहशतवादी हल्ला....