वॉशिंग्टन - अमेरिकेतील पाच इंचाची मांजर पिक्सल ही जगातील सर्वात कमी उंचीच्या मनीमाऊचा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने होकार आल्यास पिक्सलच्या नावे एक नव्या विक्रमाची नोंद होईल.
कॅलिफोर्नियाच्या पोट्रेरोमधील रहिवाशी असलेल्या टिफानीजवळ मंचकिन प्रजातीची पिक्सल नावाची मांजर आहे. ती 19 महिन्यांची आहे. पिक्सलचे नाव आणि आकार टिफनीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवले होते. या मांजरीने 2012 मध्ये तिची आई फिज गर्लने बनवलेला रेकॉर्ड तोडला आहे. फिज गर्ल ही सहा इंचांची होती. मांजरीच्या या प्रजातीत दुर्मिळ असे जीन्स असतात. ज्यामुळे त्यांचे पाय छोटे असतात, असे एका संकेतस्थळाच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
टिफनीने घरात अनेक मंचकिन मांजरी पाळल्या आहेत. ती म्हणते, मांजरींमुळे मी माझ्या घराचे दरवाजे उघडे ठेऊ शकत नाहीत. सध्या मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्सची वाट पाहात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा जगातील सर्वात कमी उंचीचा किताब मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या पिक्सल मांजरीचे छायाचित्रे.....