आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारियाध - सौदी अरेबियात तीन जणांनी पाच भारतीयांचा मोठ्या प्रमाणात छळ करून त्यांना जिवंत गाडल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. 2010 मधील ही घटना आहे. न्यायालयातील एका खटल्यात हा प्रकार उजेडात आला.
कातीफ जनरल कोर्टात तीन आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पूर्वेकडील सफवाजवळील फार्महाऊसच्या पाच अवशेषांना बाहेर काढण्यात आले. आरोपींकडील काही कागदपत्रांवरून मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख काही प्रमाणात पटली आहे. कोर्टाने ओळख जाहीर केली नाही. या निर्घृण हत्येसंबंधात 25 जणांना अटक करण्यात आली आहे. मी मद्यपान आणि नशेमध्ये असताना एका मित्रासोबत ड्राइव्ह करत होतो. रात्री दहा वाजता एका मित्राचा फोन आला. त्याने लगेच आपल्या फार्महाऊसवर बोलावले होते. तेथे पाच आशियाई मजूर होते. त्यांचे हात बांधलेले होते. मी विचारले, हात का बांधले आहेत? यातील एकाने मालकाची मुलगी आणि अन्य महिलेचे शारीरिक शोषण केले.
त्यानंतर आम्ही त्यांना मोठ्या दोरीने बांधले, तोंडावर टेप लावला. त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना अडीच फूट खोल खड्ड्यात फेकून दिले, असे एका आरोपीने कबूल केल्याचा दावा अरब न्यूजने केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.