आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Misconceptions About The Israel Palestine Conflict

इस्रायल-हमासची 12 तास ‘लिमिटेड माणुसकी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरुशलेम, गाझा- गेल्या 19 दिवसांपासून सुरू असलेला इस्रायल -हमास यांच्यातील रक्तरंजित संघर्ष शनिवारी सकाळी 8 वाजेपासून (भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30) बारा तासांसाठी थांबला.

माणुसकीच्या नात्यातून हा संघर्ष बारा तास थांबवा, असे आवाहन संयुक्त राष्ट्राने केले होते. त्यानुसार इस्रायल व हमासने आपली शस्त्रे म्यान केली. पण युद्धातून थोडी उसंत घेण्यापूर्वी इस्रायलने दोन क्षेपणास्त्रे गाझा पट्टीत डागलीच. या क्षेपणास्त्रांनी एक मोठी इमारत उद्ध्वस्त केली. अर्थात गाझापट्टीतूनही दक्षिण व मध्य इस्रायलमध्ये अनेक रॉकेट्स डागण्यात आली.त्यापैकी बहुतांश रॉकेट्स इस्रायलच्या ‘आयर्न डोम मिसाइल शिल्ड’ने हवेतच निकामी केली. वेस्ट बँक, रामल्ला, नाबलुस,बेथलहॅम आणि जेरुशलेमच्या काही भागातही संघर्षाचे हे लोण पसरले आहे.
लाख 18 हजार पॅलेस्टाइन निर्वासित झाले आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या शाळा व छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
सात दिवसांची शस्त्रसंधी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अमेरिका, ब्रिटन, तुर्की आणि कतार यांची पॅरीसमध्ये बैठक होत आहेत.मात्र इस्रायलने शस्रसंधीचा प्रस्ताव फेटाळल्याचे कळते.