आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Five People Life Saved By Girl Organ Donation, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुकलीच्या अवयवदानातून पाच जणांचे प्राण वाचले, चीनमधील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - अवयवदान म्हणजे काय हे कळण्याचे ‘ति’चे वयही नव्हते... आपले डोके मोठे झाले आहे आणि नीट बोलता येत नाही, एवढेच जाणवत होते. पण वडिलांनी हृदयावर दगड ठेवून तिला दानाचा अर्थ समजावून सांगितला. आपल्या शरीरातून काही अवयव इतरांना दिले तर त्यांचे प्राण वाचतील... मृत्युशय्येवरील त्या चिमुरडीने होकार दिला आणि प्राणज्योत मालवताना तिने पाच जणांचे प्राण वाचवले..

घटना आहे चीनमधील जिअँग्झी प्रांतातील. लियू जिग्नॅओ नावाच्या तीनवर्षीय मुलीला वर्षभरापूर्वीच ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. त्यानंतर हळूहळू तिची प्रकृती खालावत होती. काही दिवसांनी मेंदूवर सूज आली. डोके फुललेले दिसत होते. नीटसे बोलता येत नव्हते. आई-वडिलांनी चीनमधील मोठ-मोठ्या शहरांतील रुग्णालयांतील डॉक्टरांच्या भेटी घेतल्या. पण जिग्नॅओच्या प्रकृतीत फार सुधारणा होऊ शकणार नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले. महिनाभरापासून ती अंथरुणाला खिळली. आपली पोर आता काही दिवसच जगणार, या विचाराने आई-वडील प्रचंड दु:खी होते. पण अशा परिस्थितीतही जिग्नॅओच्या वडिलांनी तिच्या अवयवदानाबाबत डॉक्टरांकडे चौकशी केली.

अवयव खूप लहान : २३ सप्टेंबर रोजी जिग्नॅओचा मृत्यू झाला. ठरल्याप्रमाणे तिचे अवयव प्रत्यारोपणासाठी तत्काळ काढून घेण्यात आले. जिग्नॅओ खूप लहान असल्यामुळे तिचे अवयवही अत्यंत लहान आकाराचे होते, असे डॉक्टरांनी सांगितले.

मात्र तिचे मूत्रपिंड एका रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात डॉक्टरांना यश आहे. तिचे हृदय, यकृत आणि नेत्रपटल इतर चार रुग्णांना देण्यात आले. या पाचही रुग्णांची प्रकृती आता उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

समजावणे कठीण
जिग्नॅओचे वडील लियू झिअ‍ॅबाओ यांनी अवयवदानाचा निर्णय तर घेतला, मात्र तीन वर्षांच्या आपल्या चिमुरडीला ‘डोनेशन’ या शब्दाचा अर्थ कसा समजावून सांगायचा, हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान होते. तुझ्या अवयवांमुळे इतरांचे प्राण वाचतील, असे त्यांनी सांगितल्यावर जिग्नॅओने होकार दिला.