आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Reasons Can Make Fight Between China And Japan

चीन - जपानमुळे तिस-या महायुद्धाचा धोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीन आणि जपान यांच्यादरम्यान पूर्व चीन समुद्रातील वादग्रस्त बेटांवरुन तणाव वाढत आहे. हाच वाढता तणाव तिस-या महायुद्धाचे कारण ठरु शकतो. दोन्ही देशांमध्ये १९३७ ते १९४५ दरम्यान युद्धे झाली आहेत. त्यानंतर दुसरे महायुद्ध झाले. त्याआधी जपान आणि चीनदरम्यान १८९४ ते १८९५ मध्येही युद्ध झाले होते. आता परत दोन्ही देश स्वतःसोबतच जगाला तिस-या महायुद्धाकडे घेऊन चालले आहेत. सध्याचा वाद हा पूर्व चीन समुद्रातील बेटांची श्रृंखला आहे, ज्यांना चीनमध्ये दिओऊ आणि जपानमध्ये सेनकाकू म्हटले जाते. जपानने २०व्या शतकाच्या मध्यातील कित्येक दशके चीनचा महत्त्वाचा भाग ताब्यात ठेवला होता. दुस-या महायुद्धानंतर अमेरिकेने चीनचा विरोध धुडकावून लावत हा हिस्सा जपानला दिला होता.

सध्या दोन्ही देशांनी वादग्रस्त बेटांच्या जवळ गस्त वाढवली आहे. नुकतेच अमेरिकेने या वादग्रस्त बेटांसंबंधी म्हटले होते की, ते जपानचे आहे. अमेरिकेच्या या वक्तव्याने चीनच्या जपान रागाला खतपाणीच घातले आहे. वास्तविक चीनने अमेरिकेला याआधीच बजावलेले आहे की, आमच्या वादात लक्ष घालू नये. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. अशा परिस्थितीमुळे पूर्व आशियातील या दोन महाशक्तींमध्ये युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.