पेशावर - पाकिस्तानच्या उत्तरी भागातील प्रतिबंधित क्षेत्रात झालेल्या बॉम्बस्फोटात तेहरिक-ए-तालिबान या संघटनेचे पाच अतिरेकी ठार, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. पाकमधील तिराह वॅलीतील राजगुल परिसरात ही घटना घडली.
दरम्यान, उत्तरी वजिरीस्तान भागात आयईडीच्या स्फोटात दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. अतिरेक्यांनी रस्त्यात पेरलेले भूसुरुंग काढत असताना ही घटना घडली, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. जखमी जवानांना थलमधील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.