वॉशिंग्टन - जगभरातील मोबाइल गेमर ज्या पक्ष्याचे चाहते होते. ती पुन्हा त्यांच्या भेटीला आली आहे. ही गोष्ट आहे फ्लॅपी बर्डची. फ्लॅपी बर्डचा निर्माता डॉंग गुआंगने ते पुन्हा ग्राहकांसाठी बाजारात आणला आहे.फ्लॅपी बर्ड हा मल्टिप्लेयर गेम आहे. तो केवळ अॅमेझॉन फायर टीव्हीसाठीच आहे. नव्या गेमचे नाव ' फ्लॅपी बर्डस् फॅमिली' असे आहे. यात पर्सन व्हर्सेस पर्सन मोडबरोबर अनेक नवे फीचर्सचेही समावेश करण्यात आले आहे.
व्हिएतनामचा गुआंगने हा गेम 10 फेब्रुवारी रोजी हा गेम अॅपवरून हटवण्यात आला होता. लोकांच्या आग्रहास्तव त्याने फ्लॅपी बर्ड गेम मे महिन्यात आणण्याचा वचन दिले होते.