आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flight In Air, Pilot Slept; Goodluck 325 Travelling Safe

ब्रिटनमधील घटना: विमान हवेत, वैमानिक झोपले;सुदैवाने 325 प्रवासी सुखरूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विमान उडत असताना प्रवाशांचा विश्वास वैमानिकांवर असतो, तेच जर डुलकी काढत असतील तर? अगदी असाच अनुभव ब्रिटनमध्ये आला. ब्रिटनच्या एअरबस ए 330 विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कॉकपिटमधील असलेल्या दोन वैमानिकांनी खूशाल डुलकी काढली. विमानात त्यावेळी 325 प्रवासी होते.

डुलकी काढण्यासाठी त्यांनी विमानाला ऑटो-पायलट मोडवर ठेवले होते, ही धक्कादायक बाब सदर वैमानिकांनीच कबूल केली. वास्तविक दूरच्या प्रवासावर असताना वैमानिकांनी एकापाठोपाठ विश्रांती घ्यावी, असा नियम आहे. त्यासाठी दोघांना सात तासांची सुटी दिली जाते. परंतु दोन्ही वैमानिकांनी एकाच वेळी डुलकी काढली. ही डुलकी किती कालावधीची होती. याचाही त्यांना अंदाज आला नाही. म्हणूनच त्यांची झोप सुरू असताना विमान किती अंतर उडाले हे देखील त्यांना सांगता आले नाही.


प्रवाशांचे दैव बलत्तर म्हणून वैमानिकांची तंद्री उडाली व पुढील अनर्थ टळला. हा प्रकार जाहीर झाल्यानंतर सिव्हिल एव्हिएशन अ‍ॅथॉरिटीकडून (सीएए) त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, अशी अपेक्षाही प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आली.